दुर्ग मित्र परिवाराने केली राजगड-तोरणा अवघड मोहीम सर

173

नवी मुंबईच्या नेरुळ येथील दुर्ग मित्र परिवारातर्फे 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत राजगड-तोरणा ही अवघड ट्रेकिंग मोहीम आखण्यात आली होती. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे येथील तब्बल 35 सदस्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व सदस्यांनी ही अवघड मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.

या मोहिमेचे प्रमुख स्वप्नील घोलप, नीलम घोलप, अभिजीत भोसले, विशाल कुटल, तनुजा कुटल आणि मानसी उटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सर करण्यात आली आहे. नियोजन समितीने अतिशय उत्तमरित्या नियोजन करून राजगड-तोरणा ही अवघड ट्रेकिंग मोहीम एकूण ३५ सदस्यांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडली आहे.

चिमुकल्यांनीही घेतला सहभाग

या मोहिमेतील उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वात लहान असलेल्या शौर्या घोलप (वय-३ वर्षे) आणि राजनंदिनी घोलप (वय ९ वर्षे) यांनी सदर मोहिमेत सहभाग घेतला होता. ही अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब असून याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही अतिशय अवघड मोहीम सर करून दुर्ग मित्र परिवारांनी अजून एक यशाचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे.

या सदस्यांचा सहभाग

१. स्वप्नील घोलप – नेरुळ
२. निलम घोलप – नेरुळ
३. राजनंदिनी घोलप( वय-९ वर्ष)-नेरुळ
४. शौर्या घोलप (वय-३ वर्षे) -नेरुळ
५. मानसी उटीकर – भायखळा
६. डॉ. यझदान – भायखळा
७. निखिल सणस – भायखळा
८. मेरझाॅड अताई – टिटवाळा
९. जयदीप गांगले- टिटवाळा
१०. वसंत उटीकर – भायखळा
११.विशाल कुतळ – नवी मुंबई
१२. तनुजा कुतळ – नवी मुंबई
१३. नागेश नाचणकर-भांडूप
१४. निलेश सांडे – टिटवाळा
१५. सोहम नाईक – बदलापूर
१६. योगेश भांड – ठाणे
१७. प्रज्योत करंजे – रोहा रायगड
१८. मयूर बामुगडे – रोहा रायगड
१९. शंकर जाधव – पुणे
२०. गजानन नागे- वाशी
२१. दिनेश सोनवणे – नवी मुंबई
२२. गौरव देसाई – घाटकोपर
२३. जुई रणसिंग – घाटकोपर
२४. पुनम देसाई – घाटकोपर
२५. दीपक काळे – नवी मुंबई.
२६. कृतीका वाघ – नवी मुंबई.
२७. अनिकेत आठल्ये – भांडूप
२८. प्रफुल्ल दळवी – पनवेल
२९. अभिजीत भोसले – जुईनगर
३०. विनायक ठाकूर रोहा -रायगड
३१. श्रुती रणसिंग – घाटकोपर
३२. हर्ष कालेकर – लोणावळा
३३. विराज उटीकर-टिटवाळा
३४. संदीप सोदागर -टिटवाळा
३५. नितिन साठे – नवी मुंबई

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.