कोरोना काळातील भारतीयांचा सर्वाधिक आवडता नाश्ता कोणता ठरला? वाचा…

127

सर्दी आणि तापाच्या वेळी घेतलेल्या पॅरासिटामोल या गोळ्यांच्या विक्रीत गेल्या दोन वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. हा आकडा किती मोठा आहे, हे समजल्यावर धक्का बसेल. या दोन वर्षाच्या कोरोना काळात भारतीयांनी नाश्ता म्हणून डोलो-650 गोळ्या खाल्या की काय, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. या काळात भारतीयांनी थोडे थोडके नाही, तर तब्बल 350 कोटी डोलो – 650 गोळ्यांचे सेवन केले आहे. हा आकडा किती गगनचुंबी आहे, याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता, 350 करोड पॅरासिटामोल गोळ्या सरळ करुन एकत्र ठेवल्या गेल्या, तर त्याची उंची माऊंट एवरेस्टहून 6 हजार पटीने अधिक असेल आणि बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीपेक्षा 63 हजार पट जास्त असेल.

दुपटीने वाढली विक्री

IQVIA संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये कोविडचा उद्रेक होण्यापूर्वी भारतात डोलो गोळीच्या 75 दशलक्ष स्ट्रिप्स विकल्या गेल्या होत्या. नोव्हेंबर 2021 पर्यंत, त्याची विक्री दुप्पट झाली (14.5 कोटी स्ट्रिप्स ) म्हणजेच 217 कोटी स्ट्रिप्स विकल्या गेल्या. भारताला सप्टेंबर 2020 मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेचा फटका बसला, त्यानंतर 2021 मध्ये भारताला दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. भारतातील अनेक लोकांचे प्राण गेले. या काळात भारतात एकूण 35 दशलक्ष कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली आणि या महामारीच्या काळात 350 कोटी गोळ्या विकल्या गेल्या.

हाही विक्रम डोलोच्या नावे 

आज डोलो भारतात तापाच्या गोळ्यांच्या विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची वार्षिक उलाढाल सुमारे 307 कोटी रुपये आहे, तर GSK ची Calpol यापेक्षा थोडी वर आहे आणि तिची उलाढाल 310 कोटी आहे. त्याचप्रमाणे भारतात लोकप्रिय असलेली क्रोसिन विक्रीत सहाव्या क्रमांकावर असून, तिची विक्री 23.6 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, Dolo 650 ही केवळ सर्वाधिक विकली जाणारी टॅबलेट नाही, तर Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या कीवर्ड पैकी एक आहे. जानेवारी 2020 पर्यंत, Dolo 650 दोन लाख वेळा सर्च करण्यात आलं. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कॅल्पोल 40 हजार वेळा सर्च केली गेली.

( हेही वाचा: …आणि कर्णधारपद सोडण्याआधी आलेली ‘ती’ ऑफर विराटने धूडकावून लावली! )

डोलो इज द बेस्ट

पॅरासिटोमोल हे एक सामान्य औषध आहे. हे औषध 1960 मध्ये बाजारात आले. क्रोसिन, डोलो आणि कॅल्पोल हे तीन प्रसिद्ध ब्रँड आहेत, जे पॅरासिटोमोल म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर नजर टाकली, तर डोलोच्या मीम्सचा पूर आला आहे. भारतात डोकेदुखी, दातदुखी, कोविड ताप किंवा अंगदुखी आहे, प्रत्येक समस्येवर एकच उपचार आहे, डोलो. डोलोचे हे यश नवीन नाही. 2010 मध्ये, डोलो 650 ने सर्वाधिक व्यवस्थापित ब्रँड पुरस्कार जिंकला. यासोबतच या ब्रॅंडला आणखी अनेक सन्मान मिळाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.