Indian Cricketer: सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेले ‘हे’ आहेत माजी भारतीय क्रिकेटर ?

145
Indian Cricketer: सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेले 'हे' आहेत माजी भारतीय क्रिकेटर ?

इरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना हे माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांना ई.ए.एस. प्रसन्ना या नावाने ओळखले जाते. ते एक फिरकी गोलंदाज होते आणि ऑफ स्पिन करायचे तसेच ते इंडियन स्पिन क्वार्टेटचे सदस्यदेखील होते. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, म्हैसूर येथून शिक्षण पूर्ण केले. (E.A.S. Prasanna)

प्रसन्ना यांचा जन्म २२ मे १९४० रोजी बंगळुरु येथे झाला. १९६१ मध्ये इंग्लंडविरुद्ध मद्रास येथे कसोटी क्रिकेट सामना खेळून त्यांनी पदार्पण केले. त्यांचा पहिला परदेश दौरा वेस्ट इंडिजमध्ये होता. आपली अभियांत्रिकी पदवी पूर्ण करण्यासाठी काही कालावधीसाठी त्यांनी क्रिकेट सोडले. पुढे १९६७ मध्ये त्यांनी पुनरागमन केले. त्यावेळी इंग्लंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांनी संघात आपले स्थान पक्के केले. (E.A.S. Prasanna)

(हेही वाचा – Deepak Kesarkar: दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? दीपक केसरकर यांनी दिले उत्तर)

परदेशी खेळपट्ट्यांवरही यशस्वी
१९७८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर ते निवृत्त झाले. त्यांनी दोन वेळा रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचे नेतृत्व केले आहे. सलग १५ वर्षे जिंकणार्‍या मुंबईचा पराभव केला. प्रसन्ना केवळ भारतीय टर्निंग विकेटवरच नव्हे तर परदेशी खेळपट्ट्यांवरही यशस्वी ठरले. त्यांनी त्यांच्या काळात एक भारतीय गोलंदाज म्हणून २० कसोटींमध्ये सर्वात जलद १०० बळी घेण्याचा विक्रम केला. त्यांचा विक्रम पुढे रविचंद्रन अश्विनने मोडला.

कधी कधी अटॅकिंग वृत्तीने खेळायचे, तर कधी ?
त्यांच्या गोलंदाजीचे वैशिष्ट असे की, हिट मारणार्‍या फलंदाजाला ते फसवत असत. एखाद्या फलंदाजाला हिट मारण्यासाठी बॉल टाकावा आणि तो प्रसन्ना यांच्या जाळ्यात सापडावा, म्हणजे बॉल बॉंडरीच्या पलीकडे न जाता थेट फिल्डरच्या हातात जात असे. ते बॉलिंग करताना कधी कधी अटॅकिंग वृत्तीने खेळायचे, तर कधी संयमी वृत्ती बाळगून असायचे. त्यांच्या या स्वभावामुळे फलंदाजाला त्यांच्या मानसिकतेचा ठाव घेता आला नाही. २००४ मध्ये त्यांना बीसीसीआयने सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.