नाशिकमधील पार्थडी फाटा येथील आनंदनगर भागात अपार्टमेंटच्या वाहनतळात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या आगीच्या भडक्यात अन्य पाच दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अपार्टमेंटमधील सर्व रहिवासी गाढ झोपेत असताना, मध्यरात्री एकापाठोपाठ एक आवाज झाले आणि रहिवासी खडबडून जागे झाले. खिडक्या, बाल्कनीमध्ये येऊन डोकावले असता, त्यांना वाहनतळात जास्त प्रकाश आणि धुराचे लोट उठत असल्याचे दिसले.
आठ महिन्यांपूर्वी दुचाकीची खरेदी
वाल्मिक पाटील यांनी 8 महिन्यांपूर्वीच इलेक्ट्रिक बाइक खरेदी केली होती. त्यांनी नेहमीप्रमाणे ही बाईक वाहनतळात उभी केली. अचानक त्यांच्या बाईकचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यामुळे अन्य रहिवाशांच्या पाच दुचाकीही जळून राख झाल्या.
( हेही वाचा: भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशन गोदामात भीषण अग्नितांडव! )
सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली
मागच्या काही दिवसांपासून ईलेक्ट्रीक वाहने पेट घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याची फाॅरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community