गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने पेट घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात ई-बाईकने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ई-बाईकला अचानक आग लागल्यामुळे परिसरातील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. गंगापूर रोडवरील व्यावसायिकांनी त्यांच्याजवळ असलेल्या आग प्रतिरोधक पंपाच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. यानंतर ही आग विझवण्यात यश आले.
( हेही वाचा : आसाममध्ये मोठी दुर्घटना! ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाली; ३० लोक करत होते प्रवास)
ई-वाहनांबाबत प्रश्नचिन्ह
अलिकडे सतत वाहने पेट घेत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ई-वाहनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रवींद्र आव्हाड हे गुरूवारी १ वाजण्याच्या सुमारास ई-बाईकवरून गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलकडे आले होते. फुटपाथजवळ बाईक पार्क केली आणि काही खरेदी करण्यासाठी ते गेले त्यानंतर त्यांच्या गाडीतून धूर येऊ लागला.
काही वेळातच त्यांच्या ई-बाईकने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाईकवर फवारणी करून आग विझवली. या घटनेमुळे परिसरात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गंगापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community