राष्ट्रपती भवनात सापडले ट्रॅकिंग डिव्हाईस लावलेले गरुड, गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ! सत्य समोर आले आणि…

118

भारताचे पहिले नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान म्हणजेच राजधानी दिल्लीतले राष्ट्रपती भवन. या वास्तूचं एक वेगळंच महत्व आहे. या वास्तूचे संरक्षण करण्यासाठी देशातील नंबर वनची सुरक्षा तैनात असते. पण सोमवारी संध्याकाळी याच राष्ट्रपती भवनात एक धक्कादायक प्रकार समोर आला आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली.

राष्ट्रपती भवनात असलेल्या लॉनमध्ये एक गरुड मृतावस्थेत आढळले. या गरुडावर ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात आले असल्याचे समजताच केंद्रीय गुप्तचर विभाग आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिका-यांना घाम फुटला. अखेर चौकशीअंती पक्ष्याच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी मुंबईतील वन्यजीव संरक्षणासाठी काम करणा-या अधिका-यांकडून या गरुडाला ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात आल्याचे समजले आणि सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला.

(हेही वाचाः आता पद मिळवण्यासाठी शायरी यायला हवी का? काँग्रेस नेत्याचा थेट सोनिया गांधींना सवाल)

मृत गरुडावर आढळले ट्रॅकिंग यंत्र

दिल्लीच्या काही भागांत सोमवारी वादळी वा-यासह पाऊस पडला. त्यानंतर संध्याकाळी हे गरुड राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील लॉनमध्ये मृतावस्थेत सापडले. सुरक्षा यंत्रणांनी हे गरुड उचलले असता त्याला सॅटेलाईट ट्रॅकिंग यंत्र जोडण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हे आहे सत्य

त्यानंतर ताबडतोब गुप्तचर संस्था, दिल्ली पोलिसांची सुरक्षा शाखा आणि विशेष सेलचे अधिकारी यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर हे डिव्हाईस स्कॅन केल्यानंतर त्यात एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये मुंबईतील अधिका-यांचा उल्लेख आढळला. याबाबतची चौकशी केली असता त्यात संशयास्पद काहीच नसल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले. मुंबईत वन्यजीव संरक्षणासाठी काम करणा-या अधिका-यांनी पक्ष्याच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी, त्याच्या विश्रांतीची ठिकाणं, वेग आणि अन्न याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात आल्याचे सत्य समोर आले.

(हेही वाचाः चाकणकरांना धमकी देणा-याच्या दाव्याने सगळेच हैराण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.