Earthquake: अंदमान-निकोबार बेट भूकंपाच्या धक्यांनी हादरलं

अंदमान आणि निकोबारला मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या बेटांवर सकाळी पावणेसहाच्या सुमारास 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्यामुळे पर्यटक चिंतेत आहेत. अंदमान-निकोबार येथे सोमवारी पावसाळी वातावरण होते. परंतु, सकाळी 5.45 वाजता जमीनीला हादरे बसू लागले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

सुदैवाने जिवीत किंवा वित्त हानी नाही

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अंदमान-निकोबार येथे झालेल्या या भुंकपाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून 215 किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जोरदार होते परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची जिवीत किंवा वित्त हानी झाल्याची नोंद झालेली नाही.

यापूर्वीही अंदमान-निकोबार भूकंपाने हादरले

यापूर्वी देखील 4 जून रोजी अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ते हादरेही तीव्र असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी झालेल्या भूकंपाची 4.4 रिश्टर स्केल इतकी तीव्रता होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू पोर्ट ब्लेअरपासून 256 किमी आग्नेयेला होता. त्या भुंकपातही बेटावर कोणत्याही प्रकारची हानी झाली असल्याची नोंद नाही. अंदमान आणि निकोबार बेट भूकंपाच्या दृष्टीने असुरक्षित श्रेणीत येते. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंप

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये सोमवारी म्हणजे एक दिवस आधी भूकंपाचा झटका बसला होता. डोडा जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. सोमवारी दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी भूकंपाचा झटका बसला. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here