अफगाणिस्तान बुधवारी भुकंपाने हादरले. या भुंकपामुळे एक हजार लोकांचा मृ्त्यू झाला असून, दीड हजार लोक जखमी झाले आहेत, असे तालिबानकडून सांगण्यात आले आहे. शेकडो घरे उद्ध्वस्त झाली असून, मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे, असे तालिबानचे नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांनी सांगितले आहे. मागच्या दोन दशकांतील हा सर्वात भयंकर भूकंप असल्याचे बोलले जात आहे.
हा भूकंप इतका जोरदार होता की, पाकिस्तानातील लाहोर, मुलताना, क्वेटा येथेही लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय भारतातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृ्त्त आहे.
( हेही वाचा: …तर मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायलाही तयार, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन )
पाकिस्तानात भूकंप
याआधी मंगळवारी रात्री पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. येथे रात्री 2.24 ला 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. पाकिस्तानात झालेल्या या भूकंपात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तालिबानमध्ये सध्या भूकंप प्रभावीत क्षेत्रात युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
Join Our WhatsApp Community