गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के; 4.2 तीव्रतेचा भूकंप

141

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज, सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या परिसरात सोमवारी सकाळी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (आयएसआर) दिली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयएसआरच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, कच्छ जिल्ह्यात सोमवारी सकाळी 6.38 वाजता 4.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे केंद्र कच्छमधील दुधई गावाच्या उत्तर-ईशान्येस 11 किलोमीटर अंतरावर होते. यापूर्वी, सकाळी 5.18 वाजता 3.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि त्याचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील खवडा गावापासून 23 किमी पूर्व-दक्षिण-पूर्वेस होता, असे आयएसआरने सांगितले आहे.

( हेही वाचा: सिद्धिविनायक मंदिर प्रकरण: मनसेचे बांदेकरांना थेट आव्हान; ‘हिंमत असेल तर… )

2001 मध्ये विनाशकारी भूकंप

अहमदाबादपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेले कच्छ हे भूकंपाच्या अति-जोखमीच्या क्षेत्रात स्थित आहे आणि नियमितपणे कमी तीव्रतेच्या भूकंपाचा फटका बसतो. गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात असलेल्या या जिल्ह्यात जानेवारी 2001 मध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. ज्यामध्ये 13 हजार 800 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 1 लाख 67 हजार लोक जखमी झाले होते. त्यावेळी भूकंपामुळे जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांमध्ये मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.