मेघालयमध्ये भुकंपाचे धक्के; 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

4.3 magnitude earthquake jolts Gujarat
Gujarat Earthquake: गुजरातमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप

मणिपूरनंतर आता मेघालयमध्ये भूंकपाचे धक्के बसले आहेत. मेघालयमध्ये 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप झाला आहे. मंगळवारी सकाळी मेघालयमध्ये 3.2 रिश्टर स्केलच्या भूंकपाचा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये पहाटे 2:46 वाजता भूंकपाचे धक्के जाणवले. या भूंकपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 25 किमी खोलीवर होता. भूंकपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी मोजली गेली आहे. ईशान्य भारतात गेल्या दहा दिवसांमधील भूंकपाची ही चौथी घटना आहे.

( हेही वाचा: Bank Holidays in March 2023: मार्च महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद )

ईशान्य राज्यांमध्ये भूंकपाच्या धक्क्यांचे सत्र सुरुच

भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भूंकपाच्या धक्क्यांचे सत्र सुरुच आहे. मेघालयमध्ये 16 फेब्रुवारी रोजी भूंकपाचे धक्के जाणवले होते. या भूंकपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. राष्ट्रीय भूंकप विज्ञान केंद्राच्या अहवालानुसार, सकाळी 9.26 वाजता मणिपूरमध्ये भूंकप झाला आणि त्याचा केंद्रबिंदू पूर्व खासी हिल्समध्ये 46 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here