मेघालयमध्ये भूंकपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4

मेघालयमध्ये भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 3:46 वाजता राज्यातील तुरापासून 37 किमी पूर्व- ईशान्य दिशेला भूकंपाचे धक्के जाणावले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 मोजली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. बुधवार 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. महाराष्ट्रातील नाशिकमधील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकच्या पश्चिमेला 889 किमी असून तो जमिनीपासून 5 किमी खोलीवर होते. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृ्त्त नाही.

( हेही वाचा: काय आहे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न? )

मंगळवारी लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती आणि सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी हे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फाॅर सिस्माॅलाॅजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलपासून 191 किमी उत्तरेला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here