जळगावमधील भुसावळ परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भुसावळ जवळच्या सावदा, कंडारी रायपूर भागात सुद्धा १० ते २० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
( हेही वाचा : ‘हर घर जल मोहीम’: भारतातील 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना आता नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध )
भुसावळमध्ये ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह सावदा परिसरामध्ये सकाळी १० वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास भूंकपाचा धक्का जाणवला. भुसावळ परिसरात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भागात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ यांनी दिली आहे.
भुसावळमधील गडकरी नगर ग्रीन पार्क, विठ्ठल मंदिर वार्ड, शनि मंदिर वॉर्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरात सुद्धा दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.