पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास जमीन हादरल्याचे समोर आले. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्याच्या पश्चिम-उत्तर 145 किमी अंतरावर आज पहाटे 3.42 च्या सुमारास 4.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.
अमृतसरसह पंजाबच्या काही भागांत सोमवारी पहाटे 3 वाजून 42 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचं केंद्र पंजाब, पाकिस्तानमध्ये होतं. भूकंपाची खोली जमिनीखाली 120 किमी होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही पंजाबमधील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.
(हेही वाचा – “योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर…”, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली तंबी)
An earthquake of magnitude 4.1 occurred 145km west-northwest of Amritsar, Punjab, at around 3.42am, today. The depth of the earthquake was 120 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/c565a76ndE
— ANI (@ANI) November 14, 2022
दरम्यान, यापूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या आठवड्यात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या एका आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये दोनदा भूकंपांचे धक्के जाणवले होते. रोजी दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये शनिवारी 12 तारखेला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले होते.
दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. यापूर्वी 9 नोव्हेंबरला भूकंप झाला होता. त्यानंतर भारत, चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह 7 राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचवेळी नेपाळमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाल्याची बातमी समोर आली होती. भूकंपामुळे केवळ अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती, तर 6 जणांचा मृत्यू झाला होता.
Join Our WhatsApp Community