Earthquake: अंदमान निकोबार बेटांवर ४.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे

अंदमान-निकोबार बेटांवर आज, गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअरच्या भागात 253 किमी अंतरावर बुधवारी मध्यरात्रीनंतर 2:29 वाजता 4.3 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. मात्र, या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे नसल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – तुम्ही वापरत असलेल्या Google pay ला RBI ची मान्यता नाही?)

यापूर्वी अंदमान-निकोबार बेटांवर 2 आणि 3 सप्टेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 4.9 आणि 4.4 इतकी मोजली गेली होती. याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 9 नोव्हेंबरला पहाटे 1:58 च्या सुमारास, दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 मोजली गेली, ज्याचा केंद्र नेपाळमध्ये होता. दरम्यान, नेपाळमध्ये डोटी शहरामध्ये बुधवारी (8 नोव्हेंबर रोजी) झालेल्या भूकंपामुळे वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. याआधी रात्री उशिरा भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढजवळही 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here