चीनचा सिचुआन प्रांताच्या पश्चिमेकडील डोंगराळ भाग सोमवारी जोरदार भूकंपाने हादरला. सोमवारी दुपारी दक्षिण-पश्चिम चीनच्या काही भागाला भूकंपाचा धक्का बसला. भूकंपामुळे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, असे चीनच्या भूंकप नेटवर्क केंद्राने सांगितले आहे.
(हेही वाचा – शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर! म्हणाले, “तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि…”)
सिचुआन प्रांतातील लुडिंग काउंटीमध्ये दुपारी 12:52 वाजता 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली. त्याच वेळी, यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर (6 मैल) खोलीवर होते. सिचुआनची राजधानी चेंगडूच्या नैऋत्येस सुमारे 180 किमी (111 मैल) अंतरावर याचे धक्के जाणवले आहेत. केंद्राने सांगितले की, भूकंपाचे केंद्र लुडिंग शहरात 16 किलोमीटर खोलीवर होते.
चांगशा आणि शियानसारख्या दूरच्या नेटिझन्सनी सांगितले की त्यांना सिचुआनमधील भूकंपाचे धक्के जाणवले. काही मिनिटांनंतर, केंद्रानुसार लुडिंगजवळील यान शहराला 4.2 तीव्रतेचा दुसरा भूकंप बसला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 2013 मध्ये, यानला जोरदार भूकंपाचा धक्का बसला, 100 हून अधिक लोक ठार झाले आणि हजारो जखमी झाले होते.
Magnitude 6.6 earthquake strikes southwest China, reports AFP citing USGS (United States Geological Survey)
— ANI (@ANI) September 5, 2022
जूनमध्ये झालेल्या भूकंपात चौघांचा मृत्यू
चीनच्या सिचुआन प्रांतात वारंवार भूकंप होत असतात. जूनमध्येही खूप जोरदार भूकंप झाला होता. त्या वेळी 6.1 तीव्रतेचा भूकंप 2.1 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या सिचुआनची प्रांतीय राजधानी चेंगडूच्या पश्चिमेला सुमारे 100 किलोमीटर अंतरावर विरळ लोकवस्ती असलेल्या भागात झाला. त्यानंतर काही वेळातच जवळच्या काऊंटीमध्ये आणखी 4.5 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community