दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्लीसह उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या झटक्याने हादरला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून उत्तर भारतात सातत्याने भूकंपाचे झटके जाणवत आहेत.

उत्तर भारतात अचानक भूकंपाचे धक्के येण्यामागील कारण काय याविषयी अभ्यास सुरू आहे. संध्याकाळी 7.57 वाजता 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दुपारी ४.२५ वाजता ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला, ज्याचा केंद्रबिंदू ऋषिकेशमध्ये होता.

दिल्लीसह उत्तराखंडच्या पिथौरागढ, बागेश्वर, टिहरी आणि रुद्रप्रयागमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरमधील फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, हापूर येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, याआधी मंगळवारीही दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. त्यावेळीही नेपाळ हे भूकंपाचे केंद्र होते. यावेळी डोटी जिल्ह्यात घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here