नवं वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली- हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिक्टर स्केल तीव्रता

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवेल. नॅशनल सेंटर फाॅर सिस्माॅलाॅजीने या भूकंपाची तीव्रता मोजली असून, याची तीव्रता 3.8 इतकी असल्याचे सांगितले. मात्र, या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते.

नॅशनल सेंटर फाॅर सिस्माॅलाॅजीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती. दरम्यान, पहाटे 1.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

( हेही वाचा: नववर्ष नवे नियम! 2023 मध्ये होणार महत्त्वाचे बदल; सामन्यांच्या खिशावर परिणाम? )

भूकंप आल्यास काय काळजी घ्या? 

  • भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर लगेच जमिनीवर बसा आणि डोके खाली टेकवा. मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वत:चा बचाव करणे चांगले होईल.
  • वडीलधा-यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या आणि बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा.
  • भूकंपाचे धक्के खूप तीव्र असतील तर घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदनावर किंवा रस्त्यावर या
  • घरातून बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असेल आणि दोन्ही बाजूला घरे बांधलेली असतील तर घराबाहेर पडण्याऐवजी घरातच राहा.
  • भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड वस्तूंपासून दूर रहा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here