इंडोनेशियामध्ये भूकंपाचा धक्का; 46 जणांचा मृत्यू तर 700 जण गंभीर जखमी

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती मिळत आहे. इंडोनेशियातील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र सियांजूर, पश्चिम जावा येथे 10 किमी खोलीवर होते. तसेच, यामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 700 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा: श्रीमंत देश हवामान बदलासाठी जबाबदार; भरावा लागणार दंड )

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी भयभीत झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी भूकंप झाला.

काही दिवसांपासून भारतातही भूकंपाचे धक्के

भारतातही मागच्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी येथे बुधवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 4.1 मोजली गेली होती. अरुणाचल प्रदेशात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 9:55 च्या सुमारास हे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 इतकी होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here