तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के! 4.8 रिश्टर स्केल तीव्रता

118

तुर्की आणि सीरियामधील भूकंपानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केलवर आहे. पॅलेस्टाईनमधील या भूकंपाचा केंद्रबिंदू नब्लस शहरापासून १३ किमी उत्तरेस होता याची खोली १० किमी होती.

( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! महागाई भत्ता ४२ टक्के होणार)

पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के 

पॅलेस्टाईनमध्ये रात्री ११.१४ च्या सुमारास तीव्रतेचा हादरा बसला. स्थानिक वेळेनुसार वेस्ट बॅंकमधील एरियलच्या आग्नेय दिशेस सुमारे १५ किलोमीटरवक भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती पॅलेस्टाईनच्या मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, पॅलेस्टाईनसोबतच जेरुसलेम, बीट शेमेश आणि मेवासेरेट झिऑन भागांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्का जाणवले आहेत.

भारताकडून तुर्कीला मदत 

दरम्यान, भारताने तुर्कीच्या मदतीसाठी NDRF जवानांची दोन पथके आणि आवश्यक उपकरणे पाठवली आहेत. जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय पथके सुद्धा तुर्कीला रवाना झाली आहेत. तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेल यांनी संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र असे म्हणत भारताचे आभार मानले. तुर्कीला मदत पाठवण्यासाठी बैठक झाली असून तुर्की सरकारच्या समन्वयाने भारतातून एनडीआरएफ, शोध आणि बचाव पथकांसह वैद्यकीय पथक तुर्कीसाठी रवाना झाल्याची माहिची पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.