…म्हणून गुन्हेगारीत होतेय वाढ, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे मत

142

श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी देशभरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली आहे. इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध झाल्याने होणाऱ्या दुष्परिणामांकडे बोलताना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा उल्लेख केला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

(हेही वाचा – श्रद्धा हत्याकांडानंतर साध्वी प्राची भडकल्या, ‘…आता आफताबचे 500 तुकडे करा’)

न्यायमूर्ती पुढे म्हणाले, नव्या युगात नवीन उपकरणे शोधली जात आहेत. १९८९ मध्ये मोबाईल फोन नव्हते. दोन-तीन वर्षांनंतर आमच्याकडे पेजर होते. तेव्हा आमच्याकडे मोटोरोलाचे मोठे मोबाईल हँडसेट होते आणि आता ते लहान फोनपर्यंत कमी झाले आहेत. ज्यामध्ये कल्पना पण करता येणार नाही, अशा प्रत्येक गोष्टीने सुसज्ज आहेत. ते कोणीही हॅक करू शकतात. त्यामुळे हे गोपनीयतेवर आक्रमण आहे.

भारतात एनजीटीची पाच बेंच आहेत, अशा प्रकरणांच्या सुनावणीसाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायद्यानुसार प्रादेशिक खंडपीठांच्या गरजेवर भर देताना न्यायमूर्ती दत्ता म्हणाले, दिल्लीमध्ये एक मुख्य खंडपीठ असण्याऐवजी इतर सहा ठिकाणी बसण्याची परवानगी आहे का, हे आपण शोधले पाहिजे. राष्ट्रीय हरित न्यायधिकरण कायद्यानुसार प्रादेशिक खंडपीठे आहेत. संपूर्ण भारतात अशी पाच एनजीटी खंडपीठे आहेत. ही आमच्या संस्थापकांनी निश्चित केलेली उदात्त उद्दिष्टे आहेत. ज्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपली राज्यघटना तयार केली देशाचा सर्वोच्च कायदा तयार केला होता. आपण आपली राज्यघटना मोडीत काढू नये. मुंबईत प्रेम आणि दिल्लीत खून या विकृतीला इंटरनेट जबाबदार आहे. हे सर्व गुन्हे इंटरनेटवर सहज उपलब्ध झाल्याने अशा घटना वाढत असल्याचे दीपंकर दत्ता म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.