खुशखबर! आता आंबा घेऊ शकता EMIवर

178

फळांचा राजा आंब्याचं नाव घेतलं की खाद्यप्रेमींच्या तोंडात पाणी आलं नाही तर नवलंच. आपल्या गोड आणि रसाळ चवीसाठी आंबा ओळखला जातो. आंब्यांला परदेशातून ही मोठ्या प्रमाणात मागणी असते. पाहिजे ती किंमत देऊन लोकं आंब्याची खरेदी करतात. देवगड आाणि रत्नागिरीमध्ये मिळणारा हापूस आंबा त्याला अल्फानसो असंही म्हणतात. आंब्यांमध्ये हापूस आंबा चविष्ट मानला जातो. कमी उत्पादनामुळे बऱ्याचदा लोकांना आंबा मिळत नाही. तसंच किंमत अधिक असल्यामुळेही काहीजण आंबे खरेदी करताना हात आखडता घेतात. अशाच काही आंबा प्रेमींसाठी एक चांगली बातमी. आता आंबा ईएमआयवर देखील मिळू शकणार आहे. ते कसं काय? जाणून घ्या.

पुण्याच्या एका विक्रेत्यानं एक नवीन ऑफर आणली आहे. ज्यामध्ये आंब्यासाठी ईएमआय पद्धत आणली आहे. यावर्षी बाजारभाव ८०० ते १३०० रुपये प्रति डझन इतका आहे. या परिस्थितीत गौरव सनस नावाच्या व्यापारानं वेगळी शक्कलं लढवली आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सामानावर असणाऱ्या ईएमआय पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

EMIवर विकत घ्या आंबे

गुरुकृपा ट्रेडर्स एंड फ्रूट प्रोडक्ट्सचे सर्वेसर्वा सनस यांच्या म्हणण्यानुसार, ईएमआईवर आंबे विकणारी पहिली कंपनी त्यांची आहे. आंब्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना ईएमआयमुळे ग्राहकांचा भार कमी होईल. तसंच ईएमआय वर आंबे खरेदी करताना ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड असणं गरजेच आहे. शिवाय ईएमआयवर आंबे खरेदी करण्यासाठी ५००० रुपयेची खरेदी करणं गरजचं आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत चार जणांनी घेतला आहे अशी माहिती सनस यांनी दिली.

(हेही वाचा – सर्वसामान्यांना खुशखबर! CNG आणि PNG च्या दरात कपात, नवे दर किती?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.