ईडीने मनी लाॅड्रिंगच्या आरोपाखाली शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना अटक केली. रवी नारायण असे अटक केलेल्या शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांचे नाव आहे. याआधी ईडीने शेअर बाजाराचे माजी एमजी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणी अटक केली होती. याच अनुषंगाने सीबीआयकडून याप्रकरणाची समांतर चौकशी सुरु होती. सध्या रवी नारायण यांची कसून चौकशी सुरु असून, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांचाही हात आहे का, याचा शोध ईडीकडून घेतला जात आहे.
काय आहे प्रकरण
रवी नारायण हे एप्रिल 1994 पासून 2013 पर्यंत एनएसईचे प्रमुख होते. नारायण यांनी 2009 ते 2017 या काळात एनएसईच्या कर्मचा-यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. अवैधरित्या त्यांनी फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीचे वकील एन.के. पट्टा यांनी दिल्ली न्यायालयात नारायण यांच्यावर नेमका आरोप काय आहे, याबाबत माहिती दिली आहे.
( हेही वाचा: भाजप-शिंदेंची शिवसेना हिंदुत्ववादी सत्ताधारी, मग मनसे हिंदुंत्ववादी विरोधी पक्ष? )
नेमका आरोप काय?
रवी नारायण आणि इतर सहआरोपींनी एनएसई आणि त्यांच्या कर्मचा-यांची फसवणूक करण्यासाठी कट रचला होता. आरोपींनी संजय पांडे यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या माध्यमातून कर्मचा-यांचे फोन टॅप केले. या कंपनीचे नाव आईसेक सर्विस प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. सायबर सुरक्षेच्या आडून या गोष्टी केल्या गेल्या, असा आरोप करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community