शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांची टिटवाळा येथील गुरवली गावातील ७८ एकरच्या ११२ जागा EDने ताब्यात घेतल्या. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमीटेड (NSEL)घोटाळ्यातील पैशातून या जागा खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. आता या जागांचा लिलाव होईल, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी NSELघोटाळ्याचे १०० कोटी रुपये विहांग आस्था हौसिंग कंपनीमध्ये वळविले होते. त्यातून टिटवाळा येथील गुरवली गावात जमिनी घेतल्या होत्या. ३१ जानेवारी, २०१४ रोजी EDने या जमिनी संबंधी जप्तीचे आदेश दिले होते. न्यायालयीन प्रक्रियेत ट्रिब्यूनलने याला मान्यता दिली. त्यामुळे आता या जमिनींचा प्रत्यक्ष ताबाही EDने घेतला. EDने या जागांवर आपले बोर्डही लावले आहेत.
(हेही वाचा : फंजिबल एफएसआयचा ‘हिस्सा’ आणून दाखवा!)
मनी लॉन्डरिंग ऍक्ट अंतर्गत कारवाई
मनी लॉन्डरिंग ऍक्ट अंतर्गत या जमिनींचा ताबा अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. या जमिनींवर अतिक्रमण करण्यास बंदी आहे. या जमिनीसंबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये, असा बोर्ड ही EDने लावला आहे.