ईडीने गोठवले Wazir-X चे 64.67 कोटी रुपये!

क्रिप्टो करन्सी एक्सचेंज वझीर-एक्स चालवणाऱ्या झान्माई लॅबच्या संचालकांकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झाडाझडती घेतली. या कारवाईत कंपनीचे 64.67 कोटी रुपयांचे बँक बॅलन्स गोठवण्यात आले आहे.

वझीर-एक्स हे एक क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असून याचा वापर भारतात क्रिप्टो व्यवहारांसाठी अनेकजण करतात, हे वापरणे इतर एक्सचेंजच्या तुनेत अधीक सोपे असल्याने हे खूप लोकप्रीय बनले आहे. त्यामुळे वझीरएक्स हे भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. हे पीअर टू पीअर क्रिप्टो व्यवहार यावरून करता येतात. म्हणजेच, यावरून बिटकॉइन, इथरियम, रिपल, ट्रॉन, लाइटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करता येते.

(हेही वाचा – राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे तर…, भाजपाच्या केशव उपाध्येंचा हल्लाबोल)

 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या आरोपाखाली वझीरएक्सशी संबंधित 2 प्रकरणांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती दिली होती. त्याच्या काही दिवसातच वझीर-एक्सवर कारवाई करण्यात आली आहे.प्रमुख क्रिप्टो एक्सचेंजेसपैकी एक असलेल्या वजीर-एक्सच्या माध्यमातून सुमारे 2 हजार 790 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंगची चौकशी ईडी करत आहे. राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले की, ईडी क्रिप्टोकरन्सीशी संबंधित दोन प्रकरणांची या क्रिप्टो एक्स्चेंजविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत चौकशी करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here