राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर ईडीने दुस-यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिका-यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिका-यांनी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी सुरु केली आहे. ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने मुश्रीफ यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
( हेही वाचा: सदा सरवणकरांना गोळीबार प्रकरणात पोलिसांची क्लीन चीट )
हसन मुश्रीफ यांच्या घरावर दुस-यांदा धाड
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर ही दुसरी धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लाॅन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती.