राऊतांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर, सुजित पाटकर यांची चौकशी!

124

शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर आले आहेत. प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची ईडीने मागील दोन दिवस चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पाटकर हे एका वाइन वितरण कंपनीचे भागीदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुजित पाटकर फर्ममध्ये भागीदार

शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय तसेच उद्योजक प्रवीण राऊत यांना पत्राचाळ जमिनीच्या १०३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने मंगळवारी रात्री अटक केली होती. राऊत यांना गुरुवारी पीएमएलए न्यायालयाने ६ फेब्रुवारी पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान ईडीने बुधवारी आणि गुरुवारी संजय राऊत यांचे दुसरे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांचा पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान ईडीकडून पाटकर यांच्या मुंबईतील घराची झडती देखील घेण्यात आलेली असून त्यांना या प्रकरणात पुन्हा बोलावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( हेही वाचा : ‘पर हम झुकेंगे नहीं!’ संजय राऊतांनी का केले ‘पुष्पा’ स्टाईलने ट्वीट? )

पत्राचाळ जमिनीच्या एफएसआय च्या विक्रीतून आलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम पाटकर यांना मिळाली असावी असा संशय ईडीला असून या अनुषंगाने पाटकर यांच्याकडे ईडीकडून चौकशी सुरू आहे. सुजित पाटकर मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या वाइन वितरण फर्ममध्ये भागीदार असून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.