आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते तसेच मुंबई महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आयकर विभागापाठोपाठ ईडीची चौकशी जाधव यांच्या मागे लागली आहे. बुधवारी ईडीकडून फेमा कायद्यांतर्गत यशवंत जाधव यांना समन्स पाठवण्यात आला आहे.
जाधवांच्या अडचणीत वाढ होणार
शिवसेना नेते आणि मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना ईडीने फेमा कायद्यांतर्गत (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट) बुधवारी समन्स बजावण्यात आले आहे. यशवंत जाधव यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीप्रकरणी ईडी चौकशी करणार असून यामुळे जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचा पूर्णविराम; म्हणाले, “…विषय संपला”)
३६ मालमत्ता वादाच्या भोवऱ्यात
यशवंत जाधव हे अगोदरच आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकले असून आयकर विभागाच्या तपासात ३६ मालमत्ता वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असून यासंदर्भात चौकशी सुरू असताना ईडीच्या समन्समुळे जाधव यांच्या अडचणीत अधिक वाढ झाल्याचे समोर आले आहे.