दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित प्रकरण ताब्यात घेतल्यानतंर केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने आज मंगळवारी सकाळी मोठी कारवाई केली असून अनेक ठिकाणी छापे टाकल्याचे समोर आले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, हरियाणाचे गुरुग्राम, चंदीगड, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरूसह 30 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत.
(हेही वाचा – ससून रुग्णालयात हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर कोयत्याने जीवघेणा हल्ला)
दरम्यान, सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणी 30 हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. सीबीआयने नोंदविलेल्या एफआयआरनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री मनीष सिसोदिया यांना पहिला आणि मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. या प्रकरणात अनेक अज्ञात आरोपी, कंपन्यांसह एकूण 16 जणांना आरोपी करण्यात आले होते. सीबीआयने नोंदवलेल्या याच प्रकरणाचा ताबा घेत ईडी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्याची चौकशी करत आहे.
दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणात कथित घोटाळा झाल्याचा खुलासा झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीसह सुमारे 30 ठिकाणी हे छापे टाकले. याप्रकरणी ईडीने यापूर्वीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मात्र, मनीष सिसोदिया यांच्या जागेवर छापा टाकण्यात आलेला नाही.
Join Our WhatsApp Community