Ed Raid: Vivo सह चीनी कंपन्यांवर मोठी कारवाई, देशभरात 44 ठिकाणी छापे

147

मंगळवारी ईडीने चीनी स्मार्टफोन मोबाईल निर्माता कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांवर मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. ईडीच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एका चिनी कंपनीशी संबंधित चालू असलेल्या खटल्याच्या संदर्भात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि काही दक्षिणेकडील राज्यांमध्ये 40 ठिकाणी ED छापे टाकत आहेत.

(हेही वाचा – Earthquake: अंदमान-निकोबार बेट भूकंपाच्या धक्यांनी हादरलं)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये ईडीने ही कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या ही छापेमारी सुरू असून आवश्यक कागदपत्रे तपासली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. विशेष म्हणजे चिनी कंपन्या आधीच भारतीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. अशातच ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

यावर्षी मे महिन्यात ZTE कॉर्प आणि Vivo या चिनी कंपन्यांना आर्थिक अनियमिततेमुळे चौकशीला सामोरे जावे लागले होते. याशिवाय Xiaomi देखील तपासाच्या जाळ्यात अडकले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने चिनी कंपन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. तेव्हापासून, टिकटॉकसह 200 हून अधिक मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.