फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे कंपन्यांवर इडीची छापेमारी

सुपर लाइक नावाच्या अॅपच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना गंडा घालणा-या पार्ट टाइम जाॅब घोटाळाप्रकरणी सोमवारी आणि मंगळवारी ईडीने बंगळुरु येथे फोन पे, गुगल पे, अॅमेझाॅन तसेच एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, धनलक्ष्मी बॅंक आदी कंपन्यांच्या कार्यालयांवर एकूण 16 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान या सर्व कंपन्यांच्या मिळून 80 बॅंक खात्यात असलेली एक कोटी रुपयांची रक्कम देखील जप्त केली आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे.

याप्रकरणी ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुपर लाइक नावाचे एक अॅप दोन वर्षांपूर्वी बाजारात आले होते. या अॅपच्या माध्यमातून लोकांना पार्ट टाइम जाॅब केल्याप्रमाणे अधिकचे पैसे घरबसल्या मिळतील, असा दावा कंपनीने केला होता. याकरता कंपनीच्या अॅपवर लोकांना नोंदणी करुन काही पैसे भरण्यास सांगितले होते. तसेच, त्या अॅपवर विविध सेलिब्रिटींचे फोटो कंपनीतर्फे शेअर करण्यात येत होते. या फोटोंवर कमेंट करणे ते शेअर करुन प्रमोट केल्यास संबंधित ग्राहकास कंपनी पैसे देत होती. सुरुवातीच्या काही टप्प्यांत ग्राहकांना या अॅपने पैसे दिले होते. मात्र, कालांतराने या अॅपने ग्राहकांना पैसे देणे बंद केले तसेच, ग्राहकांनी नोंदणी करते वेळी जे पैसे या अॅपमध्ये भरले होते तेदेखील ग्राहकांना परत मिळाले नाहीत. याप्रकरणी दक्षिण बंगळुरु येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हा घोटाळा देशव्यापी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीकडून याचा तपास सुरु होता.

( हेही वाचा: मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू )

चिनी नागरिकांचाही समावेश 

  • ईडीने केलेल्या कारवाईत पहिल्या टप्प्यांत एकूण 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • यामध्ये दोन चिनी नागरिकांचाही समावेश असून, ईडी त्यांचा शोध घेत असल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here