शेअर ब्रोकरवर ईडीची छापेमारी; मुंबईसह ‘या’ शहरांत कारवाई

मुंबईसह दिल्ली आणि चेन्नई येथे कार्यालय असलेल्या चार शेअर ब्रोकिंग कंपन्यांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी छापेमारी करत 1 कोटी रुपये रोख तसेच सोने आणि हि-याचे दागिने जप्त केले. या तिन्ही शहरांत एकूण 16 ठिकाणी ईडीने छापेमारी केली. विशेष म्हणजे, याप्रकरणी ज्या सिक्युअर क्लाऊड तंत्रज्ञान क्षेत्राताली कंपनीने तक्रार दाखल केली होती. ती कंपनीच या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर देखील ईडीने छापेमारी केली.

ईडीकडे सोपवण्यात आला तपास

सिक्युअर क्लाऊड या कंपनीने स्वत:चे काही समभाग चार शेअर ब्रोकिंग कंपन्यांकडे तारण ठेवत त्यावर कर्जाची उचल केली होती. कालांतराने तारण ठेवलेले शेअर या ब्रोकर्सनी खुल्या बाजारात विकत त्याद्वारे 160 रुपयांची कमाई केली. यानंतर सिक्युअर क्लाऊड कंपनीने चेन्नईत पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, यातील आर्थिक व्याप्ती लक्षात घेत हा तपास ईडीकडे सोपावण्यात आला होता.

( हेही वाचा: ISRO हेरगिरी प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाकडून केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here