ईडी अर्थात अंमलबाजवणी संचनालय या केंद्रीय तपास यंत्रणेकडून राज्यात एका वर्षात २ हजार १६७ कोटी रुपयाची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती राज्यातील नेते, आमदार, बँक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील संबंधित व्यक्तींची आहे.
२०२१ वर्षात २ हजार १६७ कोटींची संपत्ती जप्त
राज्यात २०२१ हे वर्ष ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईत गेले आहे. २०२१ हे वर्ष राज्यातील राजकीय नेते आणि व्यावसायिक, बँक घोटाळे इत्यादीवर कारवाई करण्यात गेले आहे. ईडीच्या कारवाईमुळे अनेक बड्या धेंडयाच्या काळजात धस्स झाले असून राजकीय नेत्यांमध्ये देखील ईडीच्या कारवाईमुळे धडकी भरली होती ईडीकडून एकट्या महाराष्ट्रात राजकीय नेते, बँक घोटाळे बाज आणि व्यावसायिकांवर केलेल्या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात त्याची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने २०२१ या वर्षात सुमारे २ हजार १६७ कोटी रुपयाची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये आमदार प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांच्या संपत्तीचा समावेश आहे.
कुणावर कारवाई केली?
तसेच पीएमसी बँक घोटाळा, एचडीआयएल, डीएचएफएल अशी काही कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान, वाधवान ग्रुप, पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी, कर्नाळा बँक घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा संबंधित व्यक्ती यांच्या संपत्तीचा यामध्ये समावेश आहे.
Join Our WhatsApp Community