Eddie Murphy : अमेरिकन विनोदी अभिनेता आणि गायक एडी मर्फी

द गोल्डन चाइल्ड, कमिंग टू अमेरिका, हार्लेम नाईट्स, बूमरँग, द नटी प्रोफेसर, डॉ. डॉलिटल, बोफिंगर, डॅडी डे केअर आणि नॉर्बिट, ड्रीमगर्ल या चित्रपटांत त्याने (Eddie Murphy) प्रमुख भूमिका साकारल्या.

163
Eddie Murphy : अमेरिकन विनोदी अभिनेता आणि गायक एडी मर्फी

एडवर्ड रेगन मर्फी (Eddie Murphy) हा एक अमेरिकन कॉमेडियन, अभिनेता आणि गायक आहे. स्केच कॉमेडी शो सॅटरडे नाईट लाइव्हमधून तो नावारुपाला आला. या कार्यक्रमात तो १९८० ते १९८४ या काळात नियमितपणे झळकत राहिला. मर्फीचा (Eddie Murphy) जन्म ३ एप्रिल १९६१ रोजी ब्रुकलिन, न्यूयॉर्क शहरात झाला. त्याची आई, लिलियन मर्फी एक टेलिफोन ऑपरेटर होती आणि त्याचे वडील चार्ल्स एडवर्ड मर्फी एक ट्रान्झिट पोलीस अधिकारी आणि एक हौशी अभिनेता आणि कॉमेडियन होते. तो आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा खून झाला. त्याचं बालपण फार चांगलं गेलं नाही. (Eddie Murphy)

१९८० मध्ये चित्रपटांत झळकला. द गोल्डन चाइल्ड, कमिंग टू अमेरिका, हार्लेम नाईट्स, बूमरँग, द नटी प्रोफेसर, डॉ. डॉलिटल, बोफिंगर, डॅडी डे केअर आणि नॉर्बिट, ड्रीमगर्ल या चित्रपटांत त्याने (Eddie Murphy) प्रमुख भूमिका साकारल्या. ड्रीमगर्ल्समधील त्याच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. तो सर्व काळातील महान विनोदी कलाकार म्हणून ओळखला जातो. (Eddie Murphy)

(हेही वाचा – Swaminarayan : स्वामीनारायण देवळात जाता, पण ते स्वामीनारायण कोण होते?)

गायक म्हणून मर्फीची कारकीर्द चांगली

मर्फीला (Eddie Murphy) गोल्डन ग्लोब अवॉर्ड, ग्रॅमी अवॉर्ड आणि एमी अवॉर्ड तसेच अकादमी अवॉर्ड आणि बाफ्टा अवॉर्डसाठी नामांकनं मिळाली आहे. त्याला २०१५ मध्ये विनोदासाठी मार्क ट्वेन पुरस्कार मिळाला आणि २०२३ मध्ये सेसिल बी. डेमिल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२० मध्ये, सॅटरडे नाईट लाइव्ह होस्ट केल्याबद्दल कॉमेडी मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्याचा पहिला प्राइमटाइम एमी पुरस्कार त्याने जिंकला. (Eddie Murphy)

मर्फीच्या (Eddie Murphy) चित्रपटांनी युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा बॉक्स ऑफिसमध्ये $३.८ बिलियन आणि जगभरात $६.७ बिलियन पेक्षा जास्त कमाई केली आहे. गायक म्हणून मर्फीची कारकीर्द चांगली आहे. त्याने तीन स्टुडिओ अल्बम रिलीज केले आहेत, ज्यात हाऊ कुड इट बी, सो हॅप्पी आणि लव्ह्ज ऑलराईट यांचा समावेश आहे. १९८५ मध्ये आलेल्या “पार्टी ऑल द टाईम” हे गाणे देखील खूप गाजले. (Eddie Murphy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.