भारतात होणाऱ्या पाम तेलाच्या आयातीत 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात 10 लाख टन पाम तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात देशातील खाद्य तेलाच्या किंमतीत घट होण्याचा अंदाज बाजारपेठेतील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात १० जनावरं लम्पी आजारानं दगावली)
भारताने ऑगस्ट महिन्यामध्ये खाद्य तेलाची विक्रमी आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात देशात 87 टक्के जास्त तेल आयात करण्यात आले आहे. गेल्या 11 महिन्यातील ही सर्वाधिक आयात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पाम तेलाची किंमत 1800-1900 डॉलर मेट्रिक टनावरून घसरून 1100 डॉलर मेट्रिक टन वर आली आहे. इतर खाद्यतेलापेक्षा स्वस्त असलेले पाम तेल अधिक प्रमाणात आयात केले आहे.
दरम्यान, देशात सणासुदीचा काळ आहे. काही दिवसांवर दसरा, दिवाळी आहे. त्यातच दिवाळीनंतर लग्नसराईचाही हंगाम येत आहे. या परिस्थितीत पाम तेलाची मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे पाम तेलाची आयात वाढली असून आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने पाम तेलाच्या आयातीवर 5.5 टक्के कर लावला आहे. त्याचबरोबर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात आगामी एक वर्षापर्यंत शुल्कमुक्त करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community