महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुरुवार, ६ जून रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार (Award) प्रदान करण्यात आला. यावेळी अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या हस्ते ‘हिंदुस्थान पोस्ट’ माध्यम समूहाचे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह स्वप्नील सावरकर यांना ‘व्रतस्थ पत्रकारिता सन्मान’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील सातारा रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, दैनिक लोकमतचे चेअरमन विजय दर्डा, दैनिक पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, अभिनेता भाऊ कदम, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक संजय मालपाणी लोकमतचे समूह संपादक विजय बावीस्कर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्योजक संजय मालपाणी, अभिनेता भाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, संपादक संजय आवटे, अविनाश चिलेकर, ज्ञानेश्वर बिजले, बांधकाम व्यावसायिक विश्वास जावडेकर, गिरीराज सावंत, कलाकार ओंकार वासकर, ईश्वर गौरांगदास, राजेंद्र शिळीमकर, बाबा कांबळे, निलेश खेडेकर, दशरथ भोसले, सिद्धार्थ भोकरे या कर्तव्यदक्ष उच्चपदस्थ अधिकारी, संपादक-पत्रकार व मान्यवरांचाही सन्मान (Award) करण्यात आला. किरण जोशी यांनी स्वागतपर भाषण केले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविकात गोविंददेव गिरी महाराज यांच्याविषयी गौरवपूर्ण उल्लेख केला. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
Join Our WhatsApp Community