ईडीकडून खासदार भावना गवळींना तिसरं समन्स!

81

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. या समन्सद्वारे भावना गवळी यांना २४ नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती एएनआयने दिले आहे.

(हेहे वाचा- अबकारी करात मोठी कपात, महाराष्ट्रात इम्पोर्टेड स्कॉच व्हिस्की स्वस्त)

तिसऱ्या समन्सनंतर हजर राहणार का?

भावना गवळी यांना यापूर्वी ईडीने दोन समन्स पाठवली होते. मात्र, त्यावेळी भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नव्हत्या, त्यामुळे तिसऱ्यांदा ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर भावना गवळी हजर राहणार की नाही? अशा चर्चा सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी भावना गवळी यांना दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर त्याच दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तब्येतीचं कारण सांगत भावना गवळी गैरहजर राहिल्या होत्या. मात्र आता तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर भावना गवळी चौकशीला हजर राहणार राहणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

असा होता भावना गवळींवर आरोप

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. भावना गवळी यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.