ऑल द बेस्ट! दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

197

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. यासह राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती समस्त विद्यार्थी व पालकांना देत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यापूर्वी शिक्षण विभागाकडून परीक्षांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत होणार आहे. तर, बारावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत होणार असून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in याअधिकृत वेबसाईटवर पहायला मिळणार आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक

Exam time table

15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल :  सामाजिक शास्त्र पेपर 2

4 मार्च – इंग्रजी
5 मार्च – हिंदी
7 मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
8 मार्च – संस्कृत
10 मार्च – फिजिक्स
12 मार्च – केमिस्ट्री
14 मार्च – माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
17 मार्च – बायोलॉजी
19 मार्च – जियोलॉजी
9 मार्च-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
11 मार्च – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
12 मार्च – राज्यशास्त्र
12 मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
14 मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
19 मार्च – अर्थशास्त्र
21 मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
23 मार्च – बँकिंग पेपर – 1
25 मार्च – बँकिंग पेपर – 2
26 मार्च – भूगोल
28 मार्च – इतिहास
30 मार्च – समाजशास्त्र

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.