Education Is The Most Powerful Weapon : शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र का आहे?

818
education is the most powerful weapon : शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र का आहे?
education is the most powerful weapon : शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र का आहे?
शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे (education is the most powerful weapon) असं नेल्सन मंडेला (nelson mandela) म्हणाले होते. मंडेला म्हणतात, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे (education is the most powerful weapon). या शस्त्राचा वापर तुम्ही जग बदलण्यासाठी करु शकता. जोपर्यंत कोणतंही काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते असंभव वाटत राहतं. वेळ पडल्यास, तुम्हाला तुमच्या शत्रूसोबतही काम करावं लागेल. तेव्हा तोही तुमचा साथीदार होऊ शकतो.
 नेल्सन मंडेला (nelson mandela) यांचं म्हणणं असंही होतं की, आपल्याला वेळेचा सदुपयोग डोक्याने करायला हवा. कोणताही देश तोपर्यंत विकसित होऊ शकत नाही, जोपर्यंत त्या देशाचे नागरिक शिक्षित होत नाहीत… मंडेला २७ वर्षे तुरुंगात राहिले आणि पुढे जाऊन ते दक्षिण आफ्रिकाचे (South Africa) राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी मांडलेले शिक्षणाविषयीचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत.
आपल्याकडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी (Doctor Babasaheb Ambedkar) देखील शिक्षणाला प्राधान्य देऊन ’शिका, संघटिक व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश दिला. आज भारतात शिक्षित लोकांची संख्या वाढत आहे. भारतीय लोक परदेशात स्थायिक होऊन पराक्रम गाजवत आहेत.
वाचकांनो, नुकत्याच केलेल्या एका अध्ययनात असे आढळून आले आहे की, महाविद्यालयीन पदवी असलेले लोक पदवी नसलेल्या लोकांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात.
म्हणजे काय? पदवी नसलेले लोक प्रामाणिक नसतात असा याचा अर्थ होतो का? तर नाही. याचा अर्थ असा आहे की पदवीधर लोक आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकतात आणि ते भविष्यासाठी योजना करू शकतात. हा योग्य शिक्षणाचा परिणाम आहे. त्यांना कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे आणि त्यांना काय करुन दाखवायचं आहे याबद्दल ते अधिक चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचे जीवन आनंददायी होते.
अध्ययनातून असेही कळले आहे की, जे लोक आयुष्यभर शिकत असतात त्यांच्या वयानुसार त्यांची निर्णयक्षमता सुधारत राहते, तर जे लोक शिकणे थांबवतात ते काळानुसार मानसिकदृष्ट्या कमी सक्रिय होतात. आजीवन शिक्षण घेणारे लोक त्यांच्या सभोवतालचे जग इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.
शिक्षणाचा आणखी एक फायदा म्हणजे, शिक्षण घेतल्याने आपल्याला ’फरक’ करण्याची क्षमता प्राप्त होते. दोन गोष्टींमधील फरक तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्यामुळे कसे विचार करावे आणि कसे सर्जनशील होत जावे, याची शिकवण देखील शिक्षणाद्वारे आपल्याला मिळत जाते. त्याचबरोबर आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग इतरांना, पर्यावरणाला, आपल्या समाजाला सहकार्य करण्यासाठी करू शकतो. शिकलेले लोक समाजात जाऊन सुधारणा घडवून आणतात. म्हणूनच नेल्सन मंडेला (nelson mandela) म्हणाले होते की शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र (education is the most powerful weapon) आहे.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.