EeVe Tesoro : या इलेक्ट्रिक बाईकची किंमत किती आहे माहीत आहे?

ओरिसातील एक स्टार्टअप कंपनी ईव्ही टेसोरोने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

234
EeVe Tesoro : या इलेक्ट्रिक बाईकची किंमत किती आहे माहीत आहे?
EeVe Tesoro : या इलेक्ट्रिक बाईकची किंमत किती आहे माहीत आहे?
  • ऋजुता लुकतुके

इलेक्ट्रिक वाहनांचं क्षेत्र विस्तारतंय आणि नवनवीन मॉडेल बाजारात येताना दिसतायत. आता चर्चा आहे ती जून २०२४ मध्ये येऊ घातलेल्या ईव्ही टेसोरो या नवीन इलेक्ट्रिक बाईकची. ओरिसातील एक स्टार्टअप कंपनी ईव्ही टेसोरोने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०२०च्या ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने ई-बाईक क्षेत्रात उतरण्याचं सुतोवाच केलं होतं. आणि आपली ईव्ही टेसोरो तेव्हा लोकांसमोर पहिल्यांदा आणली होती. (EeVe Tesoro)

आता ही बाईक लाँच करण्याची कंपनीची तयारीही पूर्ण झालीय. सगळं मनासारखं झालं तर पुढील वर्षी जून महिन्यात ही ई-बाईक भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. बॉश कंपनीच्या हब मोटरचं इंजिन असलेली ही बाईक ताशी ९० ते १०० चा वेग गाठू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे एका चार्जमध्ये १२० किलोमीटर पर्यंत धावू शकते आणि अर्ध्या तासात तिची बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. (EeVe Tesoro)

(हेही वाचा – Ind vs Pak Review : भारत-पाक सामन्याचं दडपण पेलेल, तोच संघ जिंकेल)

म्हणूनच या बाईक विषयीची उत्सुकता आधीच निर्माण झाली आहे. शिवाय या बाईकची किंमत एक लाखांपासून सुरू होईल असाही अंदाज आहे. कारण, ई-बाईक क्षेत्रातील इतर बाईक ज्या आयक्यूब, चेतक, ऑप्टिमा या कंपन्यांनी बनवल्यात त्या किमान १,२०,००० रुपयांपासून सुरू होतात. हा आणखी एक फायदा ईव्ही टेसोरोला मिळणार आहे. सहा रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध असेल. बाईक विषयीची इतर माहिती सध्या फारशी उपलब्ध नाही. (EeVe Tesoro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.