कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीतीने आता पुन्हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. दोन लसीकरणाच्या मात्रानंतरही पुन्हा बुस्टर डोस घ्यावा लागत असल्याने लसीकरण कितपत प्रभावशील आहे, अशी शंका उपस्थित होत आहे. आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या मते, जगभरातील कोरोनाच्या लसीकरणाचा प्रभाव विशिष्ट काळापर्यंतच आहे. त्यामुळे बुस्टर डोस एक ठराविक कालावधी पार पडल्यानंतर घ्यावाच लागेल, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – दाऊद आणि पाकिस्तानमधील गँगशी ‘त्या’ महिलेचे संबंध, NIA कडून तपास करा; राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण)
२०२० साली जगभरात कोरोनाच्या पहिल्या लाटेने धुमाकूळ घातला. त्यानंतर कोरोनाच्या प्रतिबंधात्म लसीकरण मोहिमेला जगभरात सुरुवात झाली. विविध कंपन्यांच्या लशी या चीनमध्ये पहिल्या लाटेच्यावेळी दिसून आलेल्या विषाणूच्या आधारावर बनवल्या गेल्या. ओमायक्रॉन तसेच त्याच्या उपप्रकारामुळे २०२१ सालाच्या शेवटाला भारतात तिसरी लाट आली. ओमायक्रॉनचा विषाणू घातक नसला तरीही या वर्षभराच्या काळात दोन लशींच्या मात्रेमुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली होती. घरगुती विलगीकरण आणि उपचारांच्या आधारावर रुग्ण बरे झाले. ओमायक्रॉन या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण कमी राहिले.
चीन तसेच इतर देशांमध्ये ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेल्या बीएफ.७ मुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. परंतु या विषाणुच्या बाधेमुळे जगभरात कुठेही मृत्यू झाल्याचे ऐकिवात नाही, अशी माहिती नेरुळ येथील डी.व्हाय.पाटील. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीनमधील मायक्रॉबायोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ अभय चौधरी यांनी दिली. बीएफ.७ विषाणुमुळे लसीकरण झालेल्यांनाही कोरोना होऊ शकतो. मात्र मृत्यूचे प्रमाण केवळ लसीकरण तत्परतेने पार पडल्याने जगभरात कमी झाल्याचेही डॉ चौधरी म्हणाले.
ओमायक्रॉनच्या विषाणूच्या आधारावरही लस तयार पण…
अमेरिकेत चीनमधील पहिल्या लाटेतील कोरोनाचा विषाणू तसेच ओमायक्रॉनच्या विषाणूच्यासह नवी लस तयार करण्यात आली. परंतु या लसीचा फारसा परिणाम होत नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली
Join Our WhatsApp Community