इजिप्तमध्ये बस कालव्यात पडून २२ प्रवाशांचा मृत्यू

153

इजिप्तमधील मिस्रमध्ये प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने मोठी दुर्घटना घडली. यात २२ प्रवाशांचा मृत्यू, तर सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये सहा महिला आणि तीन मुलांचाही समावेश आहे.

( हेही वाचा : कुत्रा चावला किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण केली, तर मालकाला भरावा लागणार ‘एवढा’ दंड! पाळीव प्राण्यांसाठी नवे नियम लागू)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही बस महामार्गावरून घसरून मन्सौरा कालव्यात पडली. दरम्यान, १८ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसमध्ये प्रवाशांबरोबर काही विद्यार्थी, असे एकूण ४६ प्रवासी होते. या घटनेची माहिती मिळताच सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मंत्रालयाने मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख इजिप्शियन पौंड मदतीची घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इजिप्तमध्ये वारंवार अपघात होत आहे. येथे दरवर्षा हजारो लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागतो. .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.