धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या एकवीरा देवी मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दोन महिला राहत असून मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याचे समोर आले आहे. यासंर्भात मंदिर प्रशासनाला तसेच देवपूर पोलीस प्रशासनाला सूचना देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. या महिलांच्या मंदिर परिसरात असलेल्या दुकानदारांना देखील खूप त्रास दिला आहे.
महिला डाॅन पायल आणि पिंकी डाॅन अशी त्यांची नावे आहेत. या महिला आठ ते दहा साथीदारांच्या मदतीने देवदर्शनासाठी येणा-या भाविकांना त्रास देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात आणि पैसे न दिल्यास शिवीगाळ करुन धमकी देतात. याच मंदिर परिसरात असलेल्या दुकानदारांकडून हप्ते वसुलीची मागणीदेखील करतात. पैसे न दिल्यास दुकानदारांशी हुज्जत घालतात.
( हेही वाचा: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वाॅरंट जारी; काय आहे प्रकरण? )
पोलिसांत तक्रार तरीही कारवाई नाहीच
या दोनही महिला डाॅनचा मंदिर परिसरात हैदोस वाढला आहे. मंदिराच्या ओट्यावर बसून दारु पितात हा सर्व प्रकार देवपूर पोलिसांच्या निदर्शनास आणून देखील काही कारवाई झाली नाही. मंदिर परिसरात हा प्रकार बंद व्हावा म्हणून एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांना देखील परिसरातील दुकानदारांना हा सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.
Join Our WhatsApp Community