Voter ID: आता 17 व्या वर्षी बनवता येणार मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा निर्णय

मतदान करण्यासाठी वयवर्ष १८ पूर्ण असणं अनिवार्य होतं. १८ वर्ष पूर्ण असेल तर त्या तरूणाला मतदान करण्याचा हक्क बजावता येत होता. मात्र आता मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. कारण निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात निर्देश दिले असून आता १७ वर्षावरील युवक-युवतींना मतदार यादीकरता अगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदार नोंदणीबाबत तांत्रिक बाबी दूर करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यातील निवडणूक आयोगांना हे आदेश दिले आहे.

काय आहेत निवडणूक आयोगाचे निर्देश

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी १ जानेवारी रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. तरूण १७ वर्षापेक्षा अधिक असतील तर त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरावा लागेल. आता नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज भरता येणार आहे. तर प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाईल. यामधील पात्र मतदारांना पुढच्या तिमाहीत वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करता येणार आहे.

(हेही वाचा – LPG सिलिंडरच्या खाली ‘ही’ छिद्रे का असतात? तुम्हाला माहितीये? वाचा काय आहे कारण)

नोंदणी झाल्यानंतर नव मतदारांना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र जारी केले जाणार आहे. मतदार यादी २०२३ मध्ये त्यात बदल करण्यात येणार आहेत. कोणताही नागरिक १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष पूर्ण होतील, त्यांची नव्या मतदार यादीत नाव समाविष्ट असणार आहे. नुकतीच आरपी अधिनियमात दुरूस्ती करण्यात आी असून त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी योग्यता वर्षातून तिनदा देण्यात येईल. तर यापूर्वी १ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा मतदार यादीत समावेश करण्याची कट ऑफ डेट ठेवण्यात आली होती.

तेलंगणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सर्व जिल्ह्यांच्या डीएमशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून मतदान यादी सुधारण्याबद्दल माहिती देण्यास सांगितलंय. या दुरुस्तीदरम्यान झालेल्या काही चुकाही सुधारल्या जातील. या दुरुस्तीची प्रक्रिया ४ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होईल. परंतु, अंतिम यादी ८ डिसेंबर रोजी येणार असून, त्यात सर्व हरकती दूर केल्या जातील. मतदार यादीतील दुरुस्तीबाबत लोकांना माहिती व्हावी, यासाठी रविवार आणि शनिवार या दोन दिवशी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. सर्व हरकती आणि दाव्यांचा समावेश केल्यानंतर ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम यादी तयार होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here