पुन्हा गर्दी जमणार! रॅली, रोड शोवरील निर्बंध निवडणूक आयोगाने हटवले

122

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. असून प्रशासनाकडून गर्दी कमी करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, अद्याप कोरोनाचा कहर पूर्णपणे नाहीसा झालेला नसला तरी कोरोना बाधितांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. तसेच गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकाची लगबग सुरू असून या पाचही राज्यात निवडणूक प्रचारसभा, रॅली यावर कोरोनाचा संसर्ग पसरू नये, म्हणून प्रशासनाना निर्बंध टाकले होते. मात्र दिलासादायक बाब म्हणजे निवडणूक आयोगाने हे निर्बंध शिथिल केल्याचे समोर आले आहे.

परवानगी असली तरी…

उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधील कोरोनाचा संसर्ग आणि बाधितांची संख्या नियंत्रित झाल्याने मंगळवारी निवडणूक आयोगाने निवडणूक रॅली, प्रचार आणि सार्वजनिक सभांसाठी 50 टक्के उपस्थितीची मर्यादा दिली असून रोड शोला देखील परवानगी दिली आहे. असे असले तरी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (SDMA) कोविड नियम दोन्ही प्रकरणांमध्ये लागू होणार आहे.

(हेही वाचा – मलिकांचं दाऊद कनेक्शन? ईडीने घेतलं ताब्यात अन्…)

असा आहे आयोगाचा आदेश

निवडणूक आदेशाच्या आदेशात म्हटले की, राजकीय पक्ष आणि उमेदवार केवळ 50 टक्के जागेचा वापर करण्याच्या निर्बंधाशिवाय सभा आणि रॅली घेऊ शकतात परंतु, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) नियमांच्या अधीन आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम रोड शोसाठी देखील लागू असणार आहेत, जे जिल्हा प्राधिकरणांच्या पूर्व परवानगीने आयोजित केले जाऊ शकतात. केंद्रीय आरोग्य सचिवांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी भारतातील दैनंदिन बाधितांची संख्या 3.4 लाखांवरून 13,400 वर आल्यानंतर निवडणूक प्रचारासाठी निवडणूक आयोगाच्या कोविड प्रतिबंधांमध्ये शिथिलता आणली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.