लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मोठे वक्तव्य केले आहे. वन नेशन, वन इलेक्शन साठी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तयार आहे. आता या संदर्भातील अंतिम निर्णय सरकारने घ्यावा, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राजीव कुमार म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे नाही. वन नेशन, वन इलेक्शन याविषयी निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनाबाबत ते म्हणाले की, यामध्ये अनेक मुद्दे आहेत, त्यामुळे याचा अंतिम निर्णय हा सरकारने घ्यावा.
( हेही वाचा: अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात; महसूल वनविभागाची कारवाई )
एकत्र निवडणुका घेणे शक्य आहे का?
सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत हे आज काहीसे अकल्पनीय वाटत असले तरीही देशात स्वातंत्र्यानंतरची 20 वर्षे म्हणजे जवळपास 1967 पर्यंत अशाच पद्धतीने निवडणुका होत होत्या. विविध कारणांमुळे काही राज्य सरकारे बरखास्त झाली आणि नंतर ही साखळी तुटत गेली. त्यामुळे पुन्हा एकदा अशा निवडणुका होणे शक्य आहे.
Join Our WhatsApp Community