राज्यातील ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

129

राज्यातील ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून राज्यातील पूर आणि आपत्कालीन परिस्थिती बघता राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

राज्य सरकरने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. तसेच पावसामुळे ८९ व्यक्तींचे निधन झाले आहे. राज्यातील अतिवृष्टी होत असल्याने २४९ गावे बाधित झाले आहेत. पावसामुळे होणारे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील मुसळधार पावसाचा फटका सहकारी संस्थांना बसला आहे.

(हेही वाचा – औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती नाही; शनिवारी कॅबिनेटमध्ये होणार अधिकृत घोषणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.