कचऱ्यापासूनची वीज आता ‘या’ पर्यावरण पुरक कामासाठी वापरणार

मुंबई महानगरपालिकेच्‍या डी विभागाच्‍या वतीने हाजी अली केशवराव खाड्ये मार्गावर कचऱ्यापासून विजेची निर्मिती करण्यात आली आहे. या विजेचा वापर आता इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनकरता करण्यात येत आहे. याचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याठिकाणी सुमारे ३५ इलेक्ट्रिक युनिट्स असून याठिकाणी ४० मिनिटांत इलेक्ट्रिक वाहन चार्ज होते.

दररोज १८०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया

मुंबई महापालिकेच्या डी विभागाच्या वतीने हाजी अली सर्कलजवळील केशवराव खाडये मार्गावर १२०० चौरस फूट जागेवर दोन मेट्रिक टन कचऱ्यावर ऊर्जा प्रक्रिया करण्यासाठी प्लांट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दररोज १८०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून प्रतिदिन १६० सीयूएम बायोगॅस (मिथेन) निर्मिती होत आहे. त्यातून दररोज २२० युनिट वीज निर्माण होते. डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पुढाकार घेत हा राबवला.

(हेही वाचा – आम्ही फालतू विषयांवर बोलत नाही, राणांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर)

कचऱ्यापासून निर्मित विजेवर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन

या प्रकल्पाजवळ ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन सेटअप केले गेले आहे. जे या प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेद्वारे चालवले जाते. या कचऱ्यापासून निर्मित विजेवर आधारित इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण राज्‍याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुुंबई उपनगर जिल्‍हा पालकमंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते सोमवारी दुपारी पार पडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here