131 कोटींची वीजचोरी उघड!

119

वीज चोरांविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून, एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात भरारी पथकांनी वीज चोरीची 131 कोटी 50 लाखांची 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. आता जलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे.

कुठे किती पथके?

नोव्हेंबर 2021 पासून विभागीय कार्यालय स्तरावर 20 भरारी पथके सुरु.

  • कोकण-22
  • नागपूर-15
  • पुणे-14
  • औरंगाबाद-12

( हेही वाचा: Johson and Johnson baby Talc: जाॅनसन अ‍ॅंड जाॅनसन बेबी पावडरची विक्री होणार बंद )

सद्यस्थिती काय?

सध्या 63 भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिट्स कार्यरत आहेत. पथकांनी एप्रिल, मे आणि जून महिन्यात 239.58 दशलक्ष युनिटच्या वीज चोरीची 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणून वीज चोरांकडून सुमारे 54 कोटी 16 लाख 66 हजारांचा दंड वसूल केला.

प्रत्येक भरारी पथकाने महिन्याला वीज चोरीची 20 प्रकरणे उघडकीस आणली.

तीन वर्षात काय केले?

  • 2019-20: 9 हजार 250 प्रकरणांत 97.50 कोटींची वीज चोरी उघडकीस
  • 2020-21: वीज चोरीची 7 हजार 169 प्रकरणे उघडकीस; यात 87.49 कोटीची वीज चोरी पकडली.
  • 2021-22: वीज चोरीची 13 हजार 370 प्रकरणे उघडकीस; वीज चोरीची रक्कम 264.46 कोटी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.