मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईतील माटुंगा पूर्व आणि मुंबादेवी मंदिर परिसरात अत्याधुनिक पध्दतीची एलिवेटेड मल्टीलेवल मॅकेनिकल कार पार्किंगची सुविधा उभारली जात आहे. दोन्ही वाहनतळांमध्ये अनुक्रमे ४७५ आणि ५४० वाहने उभी करण्याच्या या वाहनतळांसाठी मागवलेल्या निविदांची अंतिम टप्प्यात असली तरी ही प्रक्रीया वादात अडकण्याची शक्यता आहे. या वाहनतळाच्या निविदेमध्ये पात्र ठरणाऱ्या कंपन्यांना आधीच बाद करून मर्जीतील कंपन्यांना कंत्राट देण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हालचाली केल्याने वाहनतळाच्या या निविदा खुल्या करण्यापूर्वीच त्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – आता विमानात दिसणार ‘तृतीयपंथी’ वैमानिक! DGCA ने जारी केली नवी गाईडलाईन, ‘या’ आहेत अटी)
मुंबईतील वाहनतळांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक वाहने रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी केली जातात, परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना टोविंग करत नेले जात असल्याने नागरिकांना होत असलेल्या या वाहनतळाच्या समस्येबाबत महापालिकेने आता अत्याधुनिक पध्दतीची वाहनतळे बनवण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकासमोरील मोकळी जागा, हुतात्मा चौक शेजारी जागा आणि काळबादेवी मुंबादेवी मंदिराजवळील मोकळी जागा निश्चित केल्या होत्या. त्यातील माटुंगा आणि मुंबादेवीच्या दोन जागा अंतिम करून त्याठिकाणी एलिवेटेड मल्टीलेवल मॅकेनिकल कार पार्किंगकरता १६ जून २०२२ रोजी निविदा मागवल्या होत्या.
(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का?)
माटुंगा मध्य रेल्वेच्या समोरील १५१८ चौरस मीटरच्या मोकळ्या जागेत १८ मजली अशाप्रकारे ४७५ वाहनांची क्षमता असलेले वाहनतळ उभारले जाणार आहे, तर मुंबादेवी मंदिराजवळील मोकळ्या जागेतही १८ मजली ५४० वाहनांची क्षमता असलेले वाहनतळ उभारले जाणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये काही ठराविक कंपनीला डोळ्यासमोर ठेवून काम देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता महापालिकेत ऐकायला मिळत आहे. रस्ते घोटाळा प्रकरणी काळ्या यादीतील टाकलेल्या काही कंपन्या आता पुन्हा महापालिकेत प्रवेश करू इच्छित असून त्यांना त्यातील एका कंपनीला हे काम देण्यासाठी प्रशासन आग्रही असल्याची कुजबुज रस्ते विभागात ऐकायला मिळत आहे.
यासाठी काही निविदा निकषांमध्ये बसणाऱ्या काही कंपन्यांना निविदा भरल्यानंतर काही तांत्रिक कारण देत बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने काही कंपन्यांना बाजुला करून मर्जीतील काही कंपन्यांना काम देण्याचा डाव नाही ना असा प्रश्न आता विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच ऐकायला मिळत आहे. त्यामुळे ज्या कंपन्यांच्या निविदा अप्रतिसादात्मक ठरल्याचे कारण देत बाजुला त्या कंपन्या भविष्यात न्यायालयात गेल्यास महापालिकेसमोर मोठया अडचणी निर्माण होण्याचीही भीती वर्तवली जात आहे. मात्र, प्रशासनातील काही अधिकारी आपल्या मर्जीतील कंपनीला हे काम देण्यासाठी निविदेची पाकिट तातडीने उघडून त्यांना कामे बहाल करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तसे झाल्यास सध्या निविदेत असलेल्या या कामांच्या प्रस्तावालाच ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माटुंगा पूर्व, मध्य रेल्वे स्थानकासमोर
- प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : ४७५
- वाहतळाचे बांधकाम : १८ मजले
- बांधकामाचा कालावधी : पावसाळ्यासह १५ महिने
- हमी कालावधी : ५ वर्षे
- देखभाल कालावधी : पुढील २० वर्षे
काळबादेवी, मुंबादेवी मंदिराजवळ
- प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : ५४०
- वाहतळाचे बांधकाम : १८ मजले
- वाहतळाचे बांधकाम : १८ मजले
- बांधकामाचा कालावधी : पावसाळ्यासह २४ महिने
- हमी कालावधी : ५ वर्षे
- देखभाल कालावधी : पुढील २० वर्षे