मानवी हक्क कार्यकर्ते वर्नोन गोन्झार्विसला गुरुवारी सायंकाळी जेजे रुग्णालयात दाखल केले. गोन्झार्विसला डेंग्यूची बाधा झाला असून, आठवडाभर त्याला जेजे रुग्णालयात उपचार दिले जातील. त्यांना तळोजा तुरुंगातून जेजेत दाखल करण्यात आले.
(हेही वाचा – माहिम, दादर शिवाजीपार्क ‘भगवे’मय! ‘मनसे’ची झेंडेबाजी)
गॉन्झार्विस यांना न्यूमोनिया झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र त्याबाबत जेजे रुग्णालयाने माहिती दिली नाही. गॉन्झार्विसला थकवा आणि ताप येत होता. त्यामुळे गोन्धार्विस यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी तातडीने त्यांची डेंग्यूच्या निदानासाठी चाचणी करण्यात आली. चाचणीत गॉन्झार्विसला डेंग्यूचे निदान झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांची आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनाने दिली. गॉन्झार्विस यांच्या अजून काही शारिरीक चाचण्या केल्या जातील, असेही सांगण्यात आले. सध्या त्यांना आरोपी वॉर्ड कक्षात उपचार दिले जात आहेत.
दहा दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली होती. जेलमध्ये कित्येकदा त्यांना चक्करही आली होती. ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी आणि वकिलाने विशेष कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी गॉन्झार्विस यांना जेजेत दाखल करण्यात आले.
Join Our WhatsApp Community